देशात सध्या कोरोनाबाबत काहीसा दिलासा

0
36

देशात सध्या कोरोनाबाबत काहीसा दिलासा आहे. गेल्या 24 तासांत देशभरात फक्त 12,881 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी देशात कोरोना रुग्णांचा आलेख खाली येताना दिसत आहे. मात्र कोरोनाबाबत लोकांमधील भीती निघून गेल्याने लोक हलगर्जीपणा करताना दिसत आहे, त्यामुळे रुग्णांचा आलेख लवकर वर जाण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या 24 तासात 11,987 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून, 101 जणांचं दुदैवी मृत्यू झाला आहे. सध्या देशात एकूण 1,09,50,201 कोरोना रुग्ण आहेत. देशात एकूण 1,37,342 रुग्ण आहेत. आतापर्यंत 1,56,014 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.