सोनम वांगचुक यांच्याकडून भारतीय सैनिकांना ‘कवच’

0
31

रेमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित भारतीय अभियंता सोनम वांगचुक भारतीय सैनिकांसाठी हीटिंग टेंट तयार केले आहेत. सियाचिनमध्ये कापरी भरवण्याऱ्या थंडीत दिवस काढण्याऱ्या सैनिकांना यामुळे ऊब मिळणार आहे. उणे 30 डिग्री सेल्सिअसमध्ये भारतीय सैनिक देशाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र सीमेवर गस्त घालत असतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी ऊब देणार कपडे आणि बुटं घालावी लागतात. तसेच केरोसीन आणि डिझेलचा वापर करून शेकोटी करावी लागते. त्यामुळे प्रदूषणात वाढ होते. यासाठी वांगचुक यांनी पुढाकार घेऊन ही या सोलार टेंटची निर्मिती केली. यामुळे टेंटमधील सामान्य स्थितीत राहतं आणि सैनिकांना ऊब मिळते. वांगचुक यांनी याबाबतची काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोशल मीडियावरील युजर्सही याला भरभरून साथ देत आहेत.