सुप्रीम कोर्टातील ‘ती’ याचिका सोनू सूदने घेतली मागे

0
52

मुंबई महापालिकेच्या नोटीसीविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका अभिनेता सोनू सूद याने मागे घेतली आहे. अवैध बांधकामप्रकरणी मुंबई महापालिकेने सोनू सूदला नोटीस दिली होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टातून सोनू सूदला दिलासा न मिळाल्याने त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र आता याचिका मागे घेत असल्याचे सोनू सूद यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी स्पष्ट केले आहे. कोर्टाबाहेर महापालिकेसोबत असलेला वाद सोडवू असंही त्यांनी पुढे सांगितले. सोनू सूदने महापालिकेला एक निवेदन दिले असून निर्णयाची प्रतीक्षा आहे. याचिका मागे घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने वाद चर्चेतून सोडवा असे आदेश दिलेत. त्याचबरोबर कोणतीही कारवाई करु नका असेही नमूद केले आहे.