सोनू सूदच्या ‘त्या’ ट्विटने संभ्रम

0
28

लॉकडाऊनच्या काळात गरीब जनतेसाठी हिरो ठरलेल्या अभिनेता सोनू सूदच्या ट्विटने संभ्रम निर्माण झाला आहे. सोनू सूदने केलेल्या ट्विटचा नेमका अर्थ काय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. सोनू सूदने केवळ ‘सही या गलत’ इतके ट्विट करून नेमक्या काय भावना व्यक्त केल्यात. कृषी कायद्याविरोधात जागतिक स्तरावर ट्विटरवॉर सुरु आहे. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ते गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सरकारच्या बाजून मत व्यक्त केले. सोनू सूदच्या ट्विटमुळे देखील तशाच प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

दुसरीकडे अभिनेता सोनू सूद याच्या जुहू येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार केली आहे. जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याबद्दल आक्षेप नोंदवला होता. मुंबई हायकोर्टाने आव्हान अर्ज फेटाळल्यानंतर सोनू सूदने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आज (शुक्रवारी) यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या निकालाबद्दलही ट्विट केले असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.