दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त गुणांचं काय?

0
37

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यात आणखी भीती आहे ती दहावीच्या विद्यार्थ्यांना कारण त्यांच्या हातातून अतिरिक्त गुण जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 5 ते 25 मार्क हे अतिरिक्त कार्यक्षमतेचे असतात, जसे की क्रीडा, कला यांसारख्या अतिरिक्त कौशल्यासाठी गुण देण्यात येतात. यंदा मात्र कोरोनामुळे क्रीडा तसेच चित्रकला स्पर्धाच झाल्या नाही. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना या अतिरिक्त गुणांचा लाभ होण्याची आशा धूसर आहे. दरम्यान अतिरिक्त गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यास राज्यमंडळाने मुदत वाढवून दिली आहे.