१८ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करा, अजित पवारांची मागणी

0
43

पुणे: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे यामुळे लक्षात घेता पुण्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोनाची लस द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता अजित पवार केंद्र सरकारकडे मागणी करणार आहेत.
महाराष्ट्रातील पुण्यासह वेगवेगळ्या राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे, तिथे धोरणात्मक बदल आवश्यक आहे. 18 वर्ष वयोगटावरील नागरिकांसाठी तात्काळ लसीकरण उपक्रम सुरु करण्यात यावा. त्यासाठी संबंधित राज्यांना अधिकाधिक लसी उपलब्ध करुन द्याव्यात असे अजित पवार म्हणाले