विधानसभेतून राज्याचा अर्थसंकल्प जाहीर

0
59

विधानसभेतून अर्थमंत्री अजित पवार मांडत आहेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प :

पाहूया काही महत्त्वाचे मुद्दे –

 • प्रत्येक जिल्ह्यात कोविड रुग्णांसाठी उपचार केंद्र उभारणार तसेच रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपकरणाची सोय
 • 3 लाखापर्यंत पीक कर्ज घेऊन वेळेत परत करणाऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळणार
 • कृषी क्षेत्रात 11% वाढ तसेच, उद्योगसेवा क्षेत्रात घट झाली आहे
 • एपीएमसी बळकटी होण्यासाठी 2 हजार कोटींच्या योजनेची घोषणा
 • दरवर्षी चार कृषी विद्यापीठांना 200 कोटी रुपये देणार
 • वेरूळचे ऐतिहासिक महत्व जाणून पर्यटन वाढीच्यादृष्टीने नवे विमानतळ उभारणार
 • पुण्यासाठी नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार.
 • बस स्थानकांच्या विकासासाठी 1,400 कोटींची तर परिवहन विभागासाठी 2570 कोटींची तरतूद
 • पूर्व द्रुतगती मार्गाला विलासराव देशमुख यांचं नाव देण्याची मोठी घोषणा
 • प्रत्येक जिल्ह्यात राजीव गांधी विज्ञान पार्क उभारणार जेणेकरून विज्ञान – तंत्रज्ञानाची आवड निर्माण होईल
 • पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार
 • बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद
 • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नावाने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना बसने मोफत प्रवासाची योजना
 • शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत
 • राज्यात युवकांसाठी नवीन कौशल्य विद्यापीठ सुरू करण्यास परवानगी
 • महिलादिनी राज्य सरकारचं मोठं गिफ्ट महिलांसाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना जाहीर
 • महिलेच्या नावावर घर घेतल्यास नोंदणी शुल्कात सवलत, 1 एप्रिल 2021 पासून अंमलबजावणी
 • कोस्टल रोडचं काम 2024 पूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार
 • संत जनाबाई यांच्या नावाने घरकाम करणाऱ्या महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी योजना आखणार
 • राज्यातील आठ मंदिरांचं संवर्धन करणार, पहिल्या टप्प्यात या मंदिरांसाठी 101 कोटींची तरतूद

पाहा विधानसभेतून राज्याचा अर्थसंकल्प लाईव्ह :