राज्यात थंडीची लाट

0
37
SOURCE- IMD WEBSITE
SOURCE- IMD WEBSITE

राज्यात पारा घसरला आसून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी थंडीची लाट आली आहे. विदर्भात तापमान 5 अंश सेल्सिअस खाली गेल्याची नोंद करण्यात आली. अकोला, गोंदिया, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये तापमान 5 अंशाखाली होती. 12 फेब्रुवारीनंतर थंडीची लाट ओसरेल असा अंदाज आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून नाशिक, निफाड आणि परिसरात कडाक्याची थंडी वाढली आहे. रविवारी (7 फेब्रवारी) 7.2 अंशावर असलेला पारा आज सहा अंशावर घसरला. नाशिक, निफाडमध्ये पारा घसरल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कोरोना संकटाने घटलेली निर्यात, ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि दुसऱ्यांदा थंडीचा दणका बसल्याने द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. तर दुसरीकडे नाशिक शहराचा पाराही आज 9.2 अंश सेल्सिअस आहे तर रविवारी तो 10 अंश सेल्सिअस होता.

‘आयएमडी’कडून या आठवड्यातही थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तरेकडील राज्यात होत असलेली हिमवृष्टीमुळे राज्यात थंडीचा जोर वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे