राज्यात कोरोना रुग्ण वाढल्याने चिंतेत भर

0
39

राज्यात गेल्या काही दिवसात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा चिंतेत भर पडली. अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात स्थिती हाताबाहेर जात असल्याने कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 6,112 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2,159 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर एका दिवसात कोरोनाने 44 जणांचा जीव घेतला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 20,87,632 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 19,89,963 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे राज्यात 51,713 जणांनी जीव गमावला आहे. सध्या राज्यात 44 हजार 765 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.