मोठी बातमी: राज्याचे ऊर्जामंत्री अडचणीत! पोलिसात तक्रार दाखल

0
26

राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत अडचणीत सापडले आहेत. याचं कारण म्हणजे भाजपचे माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक यांनी राऊत यांच्या विरोधात आता मुंबईतील निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राज्याची कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बेकायदेशीरपणे राज्य सरकारचं चार्टर्ड विमान वापरलं असा आरोप पाठक यांनी केला आहे. इतकंच नाही तर हे विमान वापरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची रितसर परवानगी लागत असते, मात्र अशी कोणतीही परवानगी राऊत यांनी घेतली नसल्याचाही आरोप पाठक यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीकडे केला आहे.


राऊत यांनी सरकारी कंपन्यांवर दबाव टाकत ही बिलं भरायला लावलीत, असा आरोपही पाठक यांनी आपल्या तक्ररीत केला आहे.त्यामुळे त्यांच्या विरोधात आयपीसी 406, 409 कलमांच्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी पाठक यांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांनी तर या प्रकरणी राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पाठक यांनी केली आहे. तसं न झाल्यास आपण मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करुन न्यायालयीन लढाई सुरुच ठेवू, असा इशारा सुद्धा पाठक यांनी दिला आहे.