राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटीव्ह,स्वतः ट्विट करत दिली माहिती

0
38

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh)यांना कोरोनाची लागण झाली. गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली. म्हणाले ‘आज माझी कोरोना (corona)चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल’अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर होते. त्यांचा नुकताच आता विदर्भ दौरा झाला. अनिल देशमुख यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे 

  • राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पोसिटीव्ह
  • स्वतः ट्विट करत दिली माहिती
  • संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन