राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाउन, मुख्यमंत्र्यांचा इशारा

0
49

देशाबरोबरच राज्यात देखील दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा कडक लॉकडाउनचा इशारा दिला आहे. येत्या एक दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

“कदाचित आपल्याला पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, पण ती जाऊ नये असं वाटत असेल तर ही बंधन पाळणं गरजेचं आहे,” तसेच कोरोना वाढत असल्याने पात्र असलेल्या सर्वांनी मनात कोणतीही शंका न बाळगता लस घ्यावी,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं आहे.