ठाण्यातील या भागांमध्ये आजपासून कडक लॉकडाऊन, जाणून घ्या

0
21

राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होताना दिसतोय. कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून रुग्णांची संख्या वाढतेय त्यामुळे ठाण्यात आजपासून काही भागात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.

ठाणे महापालिका प्रशासनाने कोरोनाचा वाढत्या संसर्गाला आळा बसावा या करता ठाण्यात काही हॉटस्पॉट घोषित केले आहेत. त्यामुळे आजपासून ३१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी आदेश काढले असून, शिवाजी नगर, दोस्ती विहार, हिरानंदानी मिडोज, पाटील वाडी, रुणवाल प्लाझा (कोरेस नक्षत्र), रुणवाल नगर (कोलबाद), रुस्तोमजी (वृंदावन) आई नगर (कळवा), सूर्या नगर (विटावा), खरेगाव हेल्थ सेंटर, चेंदणी कोळीवाडा, श्रीनगर, हिरानंदानी इस्टेट, लोढा माजीवाडा, रुणवाल गार्डन सिटी (बालकुम), लोढा अमारा, या १६ हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये आजपासून कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.