पुण्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू, नाईट कर्फ्युत १४ मार्च पर्यत वाढ

0
41

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत.यामध्ये पुण्यात रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. आज यामध्ये  आणखी वाढ करण्यात आली असून रात्रीची संचारबंदी १४ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. पुण्यातील शाळा, महाविद्यालये अन कोचिंग क्लास बंद राहणार आहेत.
पुण्याचे महापौर मुरलीधर महोळ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्ग वाढत असल्यानं खबदारी म्हणून महाविद्यालये आणि कोचिंग क्लास १४ मार्च २०२१ पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून या काळात ऑनलाइन शिक्षणास परवानगी असेल म्हणाले ,’रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचार निर्बंध कायम असणार आहेत. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत पुणे महानगरपालिका हद्दीत संचार निर्बंध कायम ठेवण्यात आले असून अत्यावश्यक सेवा, शिफ्टमध्ये कामकाज करणाऱ्यांना यात मुभा देण्यात येत आहे. तर, अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई सुरु राहणार आहे’