आजपासून कल्याण-डोंबिवलीत कठोर निर्बंध, प्रशासनाचा निर्णय

0
31

सध्या राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते. त्यासाठी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी सरकारने राज्यात काही जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध केले आहेत. तसेच आजपासून कल्याण-डोंबिवलीत कडक नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये हॉटेल, दुकाने, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्यासाठीच्या वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत. तसेच लग्न समारंभांवरदेखील निर्बंध घालण्यात आले आहेत.

कल्याण-डोंबिवलीत गेल्या २४ तासांत महापालिका क्षेत्रात तब्बल ३९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ५ महिन्यांनंतर पहिल्यांदाच ३०० हून अधिक कोरोना रुग्ण सापडल्याने सर्वच यंत्रणा तातडीने सतर्क झाल्याअसून .पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी तातडीने पोलीस यंत्रणा आणि आरोग्य प्रशासनाची बैठक बोलावून कठोर निर्बंध लागू करण्याबाबत निर्देश दिले.