पुण्यात आज रात्रीपासून पुन्हा संचारबंदी

0
37

पुण्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.  त्यासाठी पुण्यामध्ये आज रात्रीपासून काही कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. तसेच पुण्यामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला नसून फक्त कडक निर्बंध लावले जाणार आहेत. पुण्यातील शाळा 31 मार्चपर्यंत बंद राहणार असून  नागरिकांनी कोविडच्या नियमांचं पालन करावं असे आवाहन माहिती विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचार निर्बंध लागू राहणार आहेत. रात्री 10 वाजता हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद करण्यात येतील.

राज्यात पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, अमरावती, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद या आठ जिल्ह्यांमध्ये देशातील सर्वात जास्त ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.