रत्नागिरीत शिमगोत्सवावर कडक निर्बंध

0
36

दिवसेंदिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होताना दिसते. तसेच कोरोनाचा संसर्ग रत्नागिरी जिल्ह्यातही वाढत आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून यंदाचा शिमगोत्सव साजरा करण्यावर निर्बंध जारी करण्यात आले आहेत.तसेच  या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात शिमगोत्सवाला प्रारंभ होणार आहे.

तसेच या सणासाठी कंटेन्मेंट झोनमधून रत्नागिरीत येणार्‍या नागरिकांकडे त्यांची ७२ तासांपूर्वीची कोरोना चाचणी नकारात्मक असल्याचा अहवाल असणे आवश्यक आहे. या संदर्भात गावातील मंदिराचे विश्वस्त आणि पालखीधारकांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक आहे असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत.