राज्यात कठोर निर्बंध लादणार, सध्या लॉकडाऊन नकोच – वडेट्टीवार

0
27

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्यात दिवसेंदिवस वाढायला लागला आहे. कोरोनाची ही गंभीर परिस्थिती पाहता विजय वडेट्टीवार यांनी गंभीर इशारा दिला आहे.  राज्यात सध्या लॉकडाऊन नको, पण कठोर निर्बंध आणावे लागतील, असे मत वडेट्टीवार यांनी मांडले. तसेच लोकल वेळापत्रक रिशेड्युल करावे लागेल असे देखील ते यावेळी म्हणाले.

केरळ व महाराष्ट्र हे दोन्ही राज्य हॉटस्पॉट झाले आहेत. पण लॉकडॉऊन करावे लागेल असे सध्या मी म्हणत नसून अजून निर्बंध लावावे लागतील हे नक्की असे विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं आहे.त्याचप्रमाणे ते म्हणाले ,’सिनेमागृह बंद करावे लागतील तसेच मंगल कार्यालयावर सुद्धा वॉच ठेवावा लागेल.तामिळनाडूने सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला.महाराष्ट्रालाही याबाबत निर्णय घ्यावा लागेल. मात्र ऑनलाईन परीक्षांबाबत तपासणी करतोय’