कांदळवनाच्या संरक्षणासाठी कठोर पाऊले उचलण्यात यावीत – आदित्य ठाकरे

0
48

“कांदळवनाची होणारी कत्तल रोखणे तसेच कांदळवनावर डेब्रीज टाकून त्याचे नुकसान करण्याच्या प्रकाराला तत्काळ आळा घालणे आवश्यक असून यासाठी कठोर पाऊले उचलण्यात यावीत,” अशा सूचना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. “पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने कांदळवनांचे असलेले महत्व लोकांना समजून सांगण्यासाठी प्रबोधन करण्याबरोबरच कांदळवनाच्या जागी संरक्षक भिंती किंवा कुंपण बांधणे, सीसीटीव्ही लावणे आदी उपाययोजना करण्यात याव्यात. कांदळवनांवर डेब्रीज टाकणारी वाहने आणि संबंधीत विकासकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाया करण्यात याव्यात,” अशा सूचनाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी, उपवनसंरक्षक नीनू सोमराज, पोलीस उपायुक्त चैतन्या एस. आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.