भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामींचा केंद्र सरकारला घरचा आहेर

0
31

भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्थमंत्र्यांनी आरोग्य आणि जन कल्याण मंत्रालयाला दिलेल्या बजेटवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करत खडेबोल सुनावले आहेत.

‘अर्थमंत्र्यांनी आरोग्य आणि जनकल्याणासाठी 137 टक्क्यांची वाढ केल्याची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी पेयजल बजेटचे प्रावधान सुद्धा आरोग्य आणि जन कल्याण जोडले आहे. हे बजेट कमी केले तर आरोग्य आणि जनकल्याण कोणतीच वाढ झाल्याचे दिसणार नाही’ असं ट्विट त्यांनी केले आहे.

यापूर्वी देखील त्यांनी अर्थसंकल्पावरून सरकारवर टीका केली होती. पेट्रोल आणि डिझेलवर कृषी सेसमुळे इंधन दरवाढीचा त्यांनी इशारा दिला होता. भारत-चीन सीमा वादावरूनही मोदी सरकारवर निशाणा साधला होता. कोरोना व्हॅक्सिनच्या उत्साहात देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होत चालली आहे. याकडे दुर्लक्ष व्हायला नको असा मार्मिक टोला लगावला होता.