नासाच्या रोवर परसिवरेंसचं मंगळावर यशस्वी लँडिंंग

0
40

नासाच्या रोवर परसिवरेंसने मंगळ ग्रहाववर यशस्वीरीत्या लँडिंग केलं आहे. परसिवरेंस रोवर पृथ्वीवरुन टेकऑफ केल्याच्या 7 महिन्यानंतर मंगळावर पोहोचला आहे. गुरुवारी-शुक्रवारी रात 2 वाजून 25 मिनिटांनी रोवरने लाल ग्रहाच्या पृष्ठभागावर लँडिंग केलं. रोवरची यशस्वी लँडिंग झाल्यानं या योजनेवर काम करणाऱ्या वैज्ञानिकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता.
नासाचं रोवर मंगळ ग्रहावर जीवनाच्या संभाव्यतांचा शोध घेणार. नासाचे कार्यकारी प्रमुख स्टीव जुर्स्की यांनी परसिवरेंसच्या यशस्वी लँडिंगबद्दल आनंद व्यक्त केला आणि म्हणाले, “कोरोना काळात रोवरच्या मंगळ ग्रहावर लँडिंगच्या कामाला आणखी आव्हानात्मक बनवलं आहे. परसिवरेंस भविष्याच्या रोवर मिशनसाठी एक स्काऊटच्या रुपात काम करणार.”