जाणून घ्या, 60व्या वर्षी लग्नबंधनात अडकलेल्या सुहासिनी मुळे आपल्या नवऱ्याला पहिल्यांदा कधी भेटल्या?

0
50

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे या चर्चेत होत्या त्या आपल्या लग्नामुळे. त्या वयाच्या 60व्या वर्षी लग्नबंधनात अडकल्या. त्यांनी नुकतीच आपल्या पतीसोबतच्या भेटीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. पार्टिकल फिजिसिस्ट असलेले सुहासिनी मुळे यांचे पती अतुल गुर्तु हे त्यांना पहिल्यांदा इंटरनेटवर भेटल्या. तेव्हा त्यांचं वय 59 वर्षे होतं. भेटीनंतर दीड महिन्यात ते दोघंही लग्नबंधनात अडकल्याची माहितीही सुहासिनी मुळे यांनी दिली. तसंच कामानिमित्त फेसबुक अकाऊंट उघडलं, असल्याचंही सुहासिनी मुळे यांनी पुढे सांगितलं.