सुनील शेट्टीचा मुलगा अहान बॉलिवूडमध्ये झळकणार

0
48

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तडप या चित्रपटातून तारा सुतारीया हिच्यासोबत तो दिसणार आहे. तार सुतारीयाने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत रिलीज डेटबद्दल सांगितले आहे.  तिने लिहिले आहे कि, एक लव्ह स्टोरी खूप साऱ्या इमोशन्ससोबत.

अक्षय कुमारने देखील अहानला बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत असल्यामुळे पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. तडपचे पोस्टर शेअर करत त्यांने लिहिले की, तुझ्यासाठी मोठा दिवस आहे अहान. मला आजही आठवते की तुझे वडील सुनील शेट्टीचा पहिला चित्रपट बलवानचे पोस्टर आणि आज तुझ्या चित्रपटाचे पोस्टर प्रिसेंट करतो आहे. तडपचे पोस्टर शेअर करताना मला आनंद आणि गर्व वाटतो आहे. तसेच अक्षय कुमार लवकरच चित्रपट बच्चन पांडे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.हा चित्रपट २४ सप्टेंबर, २०२१ ला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.