अभिनेत्री सनी लियोनीवर फसवणुकीचा आरोप

0
122
SOURCE- SUNNY LEONE TWITTER HANDLE
SOURCE- SUNNY LEONE TWITTER HANDLE

अभिनेत्री सनी लियोनीवर 29 लाखांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. पेरुमबवूरचे इव्हेंट कॉर्डिनेटर आर. शियास यांनी हा आरोप केला आहे. सनीने 2016मध्ये 12 इव्हेंटसाठी 29 लाख रुपये घेतले आहेत. मात्र एकाही इव्हेंटला उपस्थिती लावली नाही. शियास यांनी व्यवहाराचे सर्व दस्ताऐवज पोलिसांसमोर ठेवले आहेत. याप्रकरणी केरळ गुन्हे शाखेने तिची चौकशी केली.

केरळ गुन्हे शाखेने सनी लियोनीच्या केलेल्या चौकशीत वेगळीच माहिती समोर आली आहे. पाच वेळाच पैसे घेतल्याचे तिने पोलिसांसमोर सांगितले. तर इव्हेंट वारंवार पोस्टपोन केल्याने उपस्थित राहू शकली नसल्याचे तिने स्पष्ट केले.

सनी लियोनी सध्या केरळमध्ये कुटुंबियांसोबत सुट्ट्यांच्या आनंद लुटण्यासाठी गेली आहे. एका खासगी चॅनेलसोबत तिला शुटींगही करायचे आहे. यासाठी ती पूवॉर आयलँडच्या एका रिसॉर्टमध्ये थांबली आहे. तिच्यासोबत तिचा पती डॅनियल आणि मुलं निशा, अशर, नोआह सुद्धा आहेत. एक महिना सनी केरळमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटणार आहे.