सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर सुनावणी

0
42

आजपासून  मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठापुढे 8 मार्च ते 18 मार्च अशी सुनावणी होणार आहे. तसेच न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठामध्ये नागेश्वर राव, हेमंत गुप्ता, रवींद्र भट आणि अब्दुल नाझीर या न्यायमूर्तीचा समावेश आहे.

“दस्तऐवजांच्या खंडांच्या प्रिंट काढायच्या असून, त्यासाठी किमान दोन आठवडे लागणार आहेत. यामुळे प्रत्यक्ष सुनावणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करावी, अशी विनंती वकील मुकूल रोहतगी यांनी ५ फेब्रवारीला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.