शाळेची फी भरावीच लागणार; सुप्रीम कोर्टाचा पालकांना धक्का

0
31

लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या शाळांची फी भरावीच लागेल असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्याने पालकांना धक्का बसला आहे. 5 मार्चपासून फी शाळेकडे जमा करावी लागेल असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पालक सहा हफ्त्यामध्ये फी भरु शकतात अशी मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतून काढता येणार नाही. मुलांना ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही, तसेच परीक्षांचा निकालही रोखून ठेवता येणार नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.राजस्थानमधील विद्या भवन सोसायटी, सवाई मानसिंग विद्यालयाची व्यवस्थापन समिती, गांधी सेवा सदन आणि सोसायटी ऑफ कॅथलिक एज्युकेशन इन्स्टिट्यूशन यांच्यामार्फेत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलाय.