‘वेगळे विचार ठेवणे हा काय देशद्रोह नाही’; सुप्रीम कोर्टानं फारुख अब्दुला विरोधातील याचिका फेटाळली

0
30

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला यांच्याविरोधातील देशद्रोह याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर फारुख अब्दुला यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली होती. त्यानंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने वेगळं मत ठेवणं हा देशद्रोह होऊ शकत नाही असं मत मांडलं आहे. तसेच याचिकेत केलेले आरोप सिद्ध होत नसल्याने याचिकाकर्त्यावर 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. कलम 370 हटवल्यानंतर अब्दुला यांनी चीन आणि पाकिस्तानकडे मदत मागितल्याचा आरोप केला होता.