UPSC उमेदवारांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, परीक्षेसाठी आणखी एक संधी नाहीच! 

0
39

गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आल्या नाहीत.यामध्ये 2020 मध्ये यूपीएससी परीक्षेसाठी शेवटची संधी होती मात्र त्यांना लॉकडाऊनमुळे ही परीक्षा अनेक विद्यार्थ्यांना देता आली नव्हती अशा विद्यार्थ्यांनी एक संधी मिळावी यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आज कोर्टात सुनावणी झाली मात्र या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिलाय तसेच आणखी एक संधी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका कोर्टाने फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एम खानविलकर, इंदू मल्होत्रा आणि अजय रस्तोगी यांच्या खंठपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी सुरु होती.