देश विरोधी ट्विटप्रकरणी सुप्रीम कोर्टाने घेतली दखल

0
36

देशविरोधी ट्विटप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दखल घेत केंद्र, ट्विटर आणि अन्य एकाला नोटीस पाठवली आहे. भाजपा नेते विनीत गोयंका यांनी जनहीत याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली आहे. सोशल मीडियावरून भारत विरोधी मजकूर पसरवल्याप्रकरणी केंद्र सरकारला तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.

दुसरीकडे केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरने 97 टक्के अकॉउंटवर कारवाई केली आहे. या अकॉऊंटच्या माध्यमातून हिंसक पोस्ट केल्याची माहिती सरकारने ट्विटरला दिली होती.