सुशांत ड्रग्स प्रकरणात एनसीबीने दाखल केली चार्जशीट

0
39

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर उघड झालेल्या ड्रग्स प्रकरणात एनसीबीने चार्जशीट दाखल केली आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील माहिती आणि फॉरेंसिक लॅबच्या अहवालाच्या आधारे ही चार्जशीट तयार केली गेली आहे. 30 हजार पानांच्या चार्जशीटमध्ये रिया चक्रवर्ती हिच्या नावाचीही नोंद आहे. रियासह 33 आरोपींची नाव या चार्जशीटमध्ये आहेत. यापूर्वी एनसीबीने रियाला ड्रग्स प्रकरणात अटकही केली होती. काही दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर तिची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.