तामिळनाडुत फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग; दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू

0
31

तामिळनाडु: तामिळनाडुच्या विरुधनगरमधील एका फटाख्याच्या कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून एका महिलेचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या घटनेनंतर तामिळनाडुचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी मृतांच्या परिवाराला 3-3 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर पंतप्रधान मोदींनी या दुर्घटनेनंतर दु:ख व्यक्त केले आहे.