तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी शशिकला यांचा राजकारणातून संन्यास

0
74

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची सहकारी आणि एआयएडीएमकेतून हकालपट्टी केलेल्या शशिकला यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचं जाहीर केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी निर्णय जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यांनी आपल्या निवेदनातून आपल्या समर्थकांना आणि एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आणि डीएमके पक्षाला पराभूत करण्याचे आवाहन केले आहे. शशिकला या आगामी विधानसभा निवडणूक लढतील, असे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा भाचा टीटीव्ही दिनाकरण यांनी सांगितले होते. तामिळनाडूत 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहेत.

बेहिशोबी संपत्ती प्रकरणात शशिकला यांना 2017 साली चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. 27 जानेवारीला चार वर्षाची शिक्षा भोगून त्यांची सुटका झाली आहे.