इन्कम टॅक्सच्या रडारवर आता तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप

0
42

काही दिवसांपासून इन्कम टॅक्स विभागाने बॉलिवूडमधील काही महत्त्वाच्या कलाकार आणि दिग्दर्शकांवर धाड टाकल्याची माहिती समोर येतेय. सूत्रांच्या माहितीनुसार तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या काही जागेवर इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकल्याची माहिती देखील आज समोर येतेय.

तसेच या कलाकारांच्या मुंबईसह पुण्यातही मालकीच्या असणाऱ्या जागेवर छापेमारी करण्यात आलीये. एकूण 22 ठिकाणी या विभागाने छापा टाकला आहे. आयकर विभागाने एका निवेदनात असे म्हटले आहे, की मुंबईत दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने छापेमारी केली असून सूत्रांच्या माहितीनुसार या छापेमारीच्या प्रकरणात आणखी काही मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे.