‘तारक मेहता’च्या सेटवर आणखी एका कलाकाराला कोरोनाची लागण

0
31

कोरोनाचा वाढत्या संक्रमणामुळे दिवसेंदिवस चिंता वाढतच चालली आहे. अनेक सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. तसेच ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधील भिडे मास्तर म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता मंदार चांदवादकर याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं सध्या मंदार घरातच उपचार घेत आहेत. तसेच ‘चाहत्यांनी काळजी करु नये, माझी प्रकृती स्थिर आहे, असा संदेशही त्यानं दिला आहे.