टीम इंडियाचा अस्टपैलु युसूफ पठाणची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

0
45

टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज युसूफ पठाणने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. युसूफने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यूसूफने त्याच्या कुटुंबियांचे, टीम इंडियातील सहकाऱ्यांचे, संघ व्यवस्थापनाचे, सर्व चाहत्यांच्याचे आणि त्याच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. युसूफ म्हणाला,’भारतासाठी दोन वर्ल्ड कप जिंकणं आणि सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन जाणं हे माझ्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण होते. मी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आयपीएलमध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वात डेब्यू केलं. तसेच आयपीएलमध्ये कोलकातासाठी गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोनदा विजेतपद पटकावलं, यासाठी गौतम गंभीरचा मी आभारी आहे’