इंग्लंड विरुद्ध अंतिम दोन कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

0
166

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यीय संघात शार्दुल ठाकुरला संधी मिळाली नाही. भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, हार्दीक, ऋषभ पंत, साहा, आर. अश्विन, कुलदीप, अक्षर पटेल, वॉशिंग्टन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.

आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी उर्वरित दोन्ही कसोटी सामने महत्त्वाचे आहेत. भारताला एक सामना ड्रा करुन एक जिंकावा लागेल किंवा दोन्ही सामने जिंकावे लागतील. तर इंग्लंडला दोन्ही सामने जिंकावे लागतील.