टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी घेतली कोरोनाची लस

0
35

कोरोना लसीकरणाचा दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबरोबरच देशभरातील लाखो लोकांनी विविध रुग्णालये आणि केंद्रात जाऊन लस घेतली. तसेच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील मंगळवारी कोरोनाची लस घेतली. हि माहिती त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून दिली.

त्या पोस्टमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की,”आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाशी लढण्यात भारतातील वैद्यकिय कर्मचारी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले, त्यामुळे जगभरात देशाची मान आणखी उंचावली आहे. या सर्वांचे आभार मानतो.”  अशाप्रकारे त्यांनी देशातील जनतेला कोरोनाची लस घेण्यासाठी आवाहन केले.