दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

0
36

एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तसेच या परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच, सुधारित वेळापत्रक http://www.mahasscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.  एक ते दीड तास आधी परीक्षेच्या केंद्रावर हजर राहणे. केंद्रावर थर्मल स्क्रीनिंग तसेच तापमान तपासले जाणार असून मास्क, पाण्याची बाटली, स्वत:चे लेखन साहित्य वापरणे बंधनकारक असणार आहे.

दहावी आणि बारावीचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा  21 मे ते 10 जून घेण्यात येणार असून 29 एप्रिल ते 20 मे रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा हि 22 मे ते 10 जून तर लिखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे घेण्यात येणार आहे

तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ”दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेविषयी कसलीही भीती मनात न बाळगता प्रामाणिकपणे आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. दूरदर्शन,यूट्यूब,झूम,गुगल मदतीला आहेत.मेहनत,चिकाटी,सरावाच्या बळावर यश मिळवा. परीक्षेला धैर्यानं सामोरं जा! सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा!” असे ट्वीट करत दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणा-या विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.