दहावी,बारावी परीक्षा वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार : शिक्षणमंत्री

0
35

दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार त्याच तारखेला ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. कोरोनाची परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यात मुलांची आरोग्य, सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. खूप साऱ्या तज्ज्ञांशी शिक्षण विभागाची  चर्चा सुरू आहे, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज स्पष्ट केलं. ऑगस्टला आम्ही सिलॅबस कमी करण्याचं काम केलं. नोव्हेंबरमध्ये बोर्ड पेपर पॅटर्न ठरवतो त्याची तपासणी कशी करायचं हे ठरतं. गावखेड्यात पेपर पोहचवायला कमीत कमी दोन महिने लागतात. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन महिने लागतात. आठवी-नववीच्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

बोर्डाच्या परीक्षेबाबत काही लोकांनी सूचना, मागण्या केल्या आहेत. मात्र पेपर पॅटर्न आणि त्यानुसार मार्क्स असतात व पेपर त्यानुसार तयार केले जातात. त्यात काही गोष्टीची आवश्यकता असेल तर तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा या वर्षीचा पाया मजबूत होणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण अजूनही सुरू राहू द्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी  ऑनलाईन शिकत आहेत. विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू राहावं हा आमचा प्रयत्न आहे. परीक्षेसंदर्भात लवकरच सांगू, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.