पाकिस्तानला दहशतवादी कृत्य भोवलं; ग्रे लिस्टमध्येच राहणार

0
37

दहशतवादी आणि दहवादी संघटना पाठिंबा दिल्याप्रकरणी पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. फायनॅन्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तान कायम राहणार आहे. एफएटीएफचे तीन निकष पूर्ण करण्यात पाकिस्तानला अपयश आल्याने आर्थिक गुंता कायम राहणार आहे. पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून ग्रे लिस्टमधून बाहे निघण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सततच्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानला यश मिळताना दिसत नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एफएटीएफची बैठक पार पडली होती. त्यावेळेसही पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवण्यात आले होते. आताही पाकिस्तानने अॅक्शन प्लॅनच्या 27 निकषांपैकी 3 निकष पूर्ण करु शकला नाही. ग्रे लिस्टमुळे आर्थिक मदत मिळणं पाकिस्तानला कठीण झाले आहे.