ठाण्यात गॅरेजला लागलेल्या आगीत 15 दुचाकी जळून खाक

0
33

ठाणे येथील डायघरमधल्या पप्पू गॅरेजला सकाळच्या सुमारास भीषणी आग लागली. या आगीत 15 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आग विझवल्यानंतर पाहणी केली असता त्यात 15 दुचाकी जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आता आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी सुरु आहे.