केंद्र महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून थोडं तरी मार्गदर्शन घेऊ शकतं – सुप्रिया सुळे

0
19

खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर देताना लोकसभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची स्तुती केली आहे. “मोदी सरकारच्या अर्थमंत्र्यांनी देशातील प्रत्येक खासदाराचे 12 कोटी रुपये न विचारता परस्पर घेऊन टाकले. लोकं विचारतात, एमपीलॅड फंड द्या. पण तो तर मोदीजी घेऊन गेले. आता अडीच वर्षांसाठी काहीच मिळणार नाही. याऊलट राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केलं. प्रत्येक आमदाराला, मग तो विरोधी पक्षातील असू दे. त्यांना 5 कोटी रुपयांचा निधी प्रत्येक वर्षाला मिळणार. यात कपात करण्यात आली नाही. जीएसटी येत नसतानाही राज्य सरकारकडून योग्य व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे केंद्राचं अर्थ मंत्रालय चालवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून थोडं तरी मार्गदर्शन घेऊ शकता”. असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला दिला आहे.