2.20 कोटी डोस उपलब्ध करून देण्याची आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

0
45

राज्यात कोरोनाची दुसरी लाट यायला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन महिन्यातील सर्वात जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून राज्यात तब्बल 178664 नवे रुग्ण सापडले आहेत.

मंगळवारी 17,864 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या 23,47,328 वर पोहोचली आहे. दिवसभरात 87 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. त्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी आणि लॉकडाऊन देखील लावले जात आहेत, मात्र तरी देखील हि संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

याच पार्श्वभूमीवर लसीकरणाला गती देण्यासाठी आणि वाढते संक्रमण थांबविण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २.२० कोटी डोस उपलब्ध  करून देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे.