पूजा चव्हाण प्रकरणातील दोन्ही अर्ज न्यायालयाने फेटाळले

0
38

सध्या जास्त प्रमाणात चर्चेत असलेले पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत दाखल केलेले दोन्ही अर्ज पुणे येथील लष्करी न्यायालयाने फेटाळले आहेत. पुण्यातील पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. त्यानंतर या प्रकरणात संजय राठोड यांच्या चौकशीचीही मागणी करण्यात आली होती. तसेच या प्रकरणाचा छडा लागावा त्याकरता काही लोकांनी पुण्याच्या लष्करी न्यायालयात धाव घेतली होती.

या प्रकरणात संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असून, या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरूच आहे. पूजाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे व घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी जस्टीस लीग सोसायटीने केली होती. तसेच भाजपाच्या कायदा सेलनेही अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायाधीश रोहिणी पाटील यांच्या पीठाने दोन्ही अर्ज फेटाळून लावले, अशी माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.