भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार प्रत्येकी 3 लाखांची मदत

0
29

भिवंडीतील नारपोली येथील पटेल कंपाऊंडमधील जिलानी इमारत कोसळून दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत 38 जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. प्रत्येकी 3 लाख रुपये देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदतीसाठी संमती दिली आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत 1.14 कोटी रुपयांचे वितरण होणार आहे.