डॉक्टरने विषारी इंजेक्शन देत संपवली कुटुंबाची जीवनयात्रा नंतर स्वतःही घेतला गळफास

0
45

कर्जत तालुक्यातील राशीन येथील डॉक्टर महेंद्र थोरात यांनी परिवारासह आत्महत्या केली आहे. कर्णबधीर मुलाच्या व्यंगाला कंटाळून परिवाराने हा निर्णय घेतल्याचे सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. तसेच या नोट मध्ये ते म्हणाले ‘आपली संपत्ती कर्णबधीर मुलांसाठी काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला दान द्यावी’ या घटनेमुळे राशीन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आज डॉक्टरांचे कुटुंबीय घरात मृतावस्थेत आढळून आले. डॉ. महेंद्र वर्षा थोरात, मोठा मुलगा कृष्णा व लहान मुलगा कैवल्य हे मृतावस्थेत आढळून आले. आधी तिघांना विषारी औषधाचे इंजेक्शन दिले यानंतर थोरात यांनी गळफास लावून घेतल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.