प्रसिद्ध मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान मोदींचे नाव , सरदार पटेल यांच्या नावाने कॉम्प्लेक्सला ओळख

0
27

अहमदाबादमधील प्रसिद्ध मोटेरा स्टेडियमचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. आज त्याचे औपचारिक उद्घाटन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याची घोषणा केली. तसेच यावेळी एक भव्य कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाईट कसोटी सामना आज या स्टेडियममध्ये सुरू होणार आहे.
मोटोरा येथे एक प्रचंड क्रीडा संकुल तयार करण्यात येत आहे. या संकुलाचा एक महत्त्वाचा भाग स्टेडियम असेल. या स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. या क्रीडा संकुलात तीन हजाराहून अधिक खेळाडूंना सामावून घेण्यात येणार असून त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाईल. सरदार पटेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स 233 एकर जागेवर बांधले जाईल. हे देशातील सर्वात मोठे क्रीडा संकुल असेल.