राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ ‘माझे कार्यालय माझी जबाबदारी’ अभियान राबविणार

0
37

कोरोना महामारी आली आणि सर्व कार्यालयांचे कामकाज थांबले मात्र हळूहळू सरकारी कार्यालयं सुरु करण्यात आले. कोरोनाबाबतची खबरदारी बाळगत ठराविक संख्येत कामकाज सुरु करण्यात आले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर परत लोकांमध्ये हलगर्जीपणा तर दिसूनच आला सोबतच कर्मचाऱ्यांची गैरहजरीही दिसून आली. त्यामुळे आता कोरोनोत्तर काळात स्वत:ला सावरण्याबरोबरच राज्याचे प्रशासकीय कामकाज सुरळीत व गतिमान होण्यासाठी राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ ‘माझे कार्यालय माझी जबाबदारी’ अभियान राबविणार. राज्यातील अधिकाऱ्यांनी शासकीय नोकरी ही वेतन घेऊन समाजसेवा करण्याची संधी मानून कार्यसंस्कृती उन्नत करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.