उद्या नितीन गडकरींच्या हस्ते होणार पहिल्या सीएनजी ट्रॅक्टरचे उद्घाटन

0
31

उद्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकर यांच्या हस्ते भारताच्या पहिल्या सीएनजी ट्रॅक्टरचे उद्घाटन होणार आहे. रॉमट्ट टेक्नो सोल्यूशन्स आणि टोमॅसेटो अचिल्ल इंडिया यांनी या ट्रॅक्टरचे रुपांतरण केले आहे. या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात उत्पन्न वाढविण्यास मदत होईल. इंधन खर्चावर वर्षाकाठी एक लाखाहून अधिक रुपयांची बचत करण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, पार्शोत्तम रुपाला आणि जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग हेदेखील या उद्धाटनाच्या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.