करीनाच्या बाळाची पहिली झलक, बाळाचा पहिला फोटो केला इन्स्टाग्रामवर शेअर

0
53

तैमुरच्या जन्मापासून अभिनेत्री करिना कपूर नेहमीच चर्चेत असते. काहीच दिवसापूर्वी करीनाने  ब्रिज कँडी रुग्णालयात आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. तसेच दुसऱ्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी सोशल मिडीयावर चाहते प्रचंड उत्सुक होते. याबाबत तिला सोशल मीडियावर विनंती देखील केली जात होती. अखेर तिनं चाहत्यांसाठी आपल्या बाळाचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला  असून जागतिक महिला दिनानिमित्त हे खास गिफ्ट असं तिनं लिहिले आहे. तसेच या फोटोद्वारे तिनं आपल्या चाहत्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.